top of page

SPITI TOUR - DAY 2

  • Writer: onroamingmode
    onroamingmode
  • Feb 24, 2022
  • 2 min read

दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो नारखंडा ला .. आजचा प्रवास जरा लांब लचक होता त्यामुळे तिथे पोहोचायलाच आम्हाला रात्र झाली .. कहर म्हणजे आमचा सुपर फास्ट ड्राइव्हर , आम्हाला काही खायचा दिसला कि आम्ही थांबवायला सांगून पण थांबवत नव्हता. इतका फास्ट होता कि आम्ही याला इथे थांब म्हणावं तर हा माणूस पार ५कमी पुढे नेउन विचारायचा रुकाऊ क्या जिथे आजूबाजूला काहीच नसायचं😒 आईशपथ असा राग येत होता ना कि बस .. म्हणून आम्ही ठरवलं कि याला १० कमी आधीच सांगायचं आणि म्हणून bikers ना सांगितलं कि आधीच सांगा आम्हाला तस.. पण हे शहाणे स्वतःच एन्जॉय करत होते .. hmmm bike वर जाण्याचा plus point you know.

enrout शिमला वरून जाताना Jab We Met ची शाळा लागली तेव्हा शाहिद आणि करीनाचा इथला scene आठवला 😍.. uff शाहिद !!! जाऊदे विषयांतर नको ..

तर , मध्ये थोडा दिढ तासाचा landslide ट्रॅफिक लागला बाकी कुठे फारसा त्रास नाझी झाला तसाही आजूबाजूचं डोंगर आणि प्रसन्न वातावरमुळे तेवढं तर माफ आहे . आणि झोपाळू हवेमुळे आम्ही सगळे बस मधेच डाराडूर पण झालो ... अहाहा सुकून कि निंद्य !! 😴


Traffic jam due to landslide


ट्रॅफिक जॅम च्या वेळी traveler च्या खिडकी बाहेरच दृश्य


रात्री traveler जेव्हा हॉटेल च्या रस्त्यावर लागली तेव्हा आधी तर अंधारामुळे आणि आजूबाजूच्या झाडांमुळे रस्त्याचा काही अंदाजच लागत नव्हता. पण गाडीच्या headlight मुळे इतका तर काळत होता कि रास्ता फारच कट to कट आहे . पण hats off आमच्या driver ला कि इतक्या निमुळत्या आणि वळणावळणाच्या रस्तावरुन गाडी काढली . कारण जेव्हा सकाळी तो रस्ता बघितला तेव्हा कळलं कि actually ती पायवाट होती आणि त्याची रात्री गाडी चालवताना काय हालत झाली असेल ते. मग पुढे एका वळणावर त्याने गाडी अजून आत नेण्यास साफ नकार दिला कारण त्याला पुढे रस्त्याचा अंदाज येत नव्हता . त्यामुळे तिथून पुढे ५ मिनिटेच आम्ही चालत गेलो.

मस्त घनदाट जंगल आणि आजू बाजूला मिट्ट काळोख .. ते भुतांच्या picture मध्ये दाखवतात ना डिट्टो तस. क्षणभर शंका आली कि इथे नक्की काही असेल कि नाही किंवा कस असेल पण पुढे हॉटेल ची light बघून पटलं कि राहतात इथेही मानास ... हूशश


काळोखात चमकणारी bike 😉

हॉटेल खरंच छान होता ... खूप भूक लागलेली त्यामुळे नंतर सगळे आपापले आवरून गरम गरम जेवणनावर तुटून पडले. त्या दिवशी उशीर झाल्यामुळे आमचं हाटू मंदिर पाहायचं राहूनच गेला ... कोई बात नही खाना अच्छा था 😋 .............. to be continued


1 Comment


Nitin Pednekar
Nitin Pednekar
Feb 24, 2022

Wahh

Like
bottom of page