top of page

Spiti Rewind : Sangala - Chitkul- Kinnaur

Writer's picture: onroamingmodeonroamingmode

आधीच्या ब्लॉग मध्ये मी रात्री Kalpa ला मुक्काम केला असा लिहिलेला त्याबद्दल क्षमस्व पण तिथल्या हॉटेल च जे वर्णन केलेला ते तंतोतंत होता .. त्या दिवसाचा रात्रीचा मुक्काम sangala valley ला होता ... आता इतक्या वर्षांनी लिहिला कि हे असाच होणार नाही का .. जाऊदे .. वय झालय असा समजून माफी असावी ;)


तर त्या दिवशी किन्नौर ला हॉटेल ला मुक्काम केल्यावर मी आणि fundoo आम्ही दोघी inroute market मधून घेतलेल्या hair dryer ने आमचे कपडे सुकवत बसलेलो ... काय करणार ना तिथे कपडे सुकताच नव्हते इतकी थंडी होती ... i hope you can understand. नंतर आमचे group members पण आमच्याकडे ड्रायर मागायला आले होते तेव्हा कळलं सगळ्यांची same च कंडिशन आहे . पण हा ड्रायर थोडा वेळच चालून गरम होऊन बंद होत होता त्यामुळे आम्हाला तो कोणालाच देता आला नाही कारण इथे आमचेच वांदे झालेले. हाथ दुखायला लागलेले ड्रायर पकडून पकडून पण काही अजून timepass नव्हता म्हणून म्हटलं ठीकेय आता काय.


सकाळी हॉटेलच्या गॅलरी मधून दिसलं कि थोड्याच अंतरावर नदी होती .. तिचा प्रवाह पण मजबूत होता .. नदीकिनारीच काहि टेंन्ट stay पण होते. पण इथे आमचे हॉटेल रूम मध्ये असून पण जर खूप थंडी होती तर तिथे त्यांचे काय हाल झाले असतील. आजूबाजूला मस्त हिरवेगार डोंगर आणि मध्ये वाहणारी नदी . एकदम desktop वर दिसणारा scene. ब्रेकफास्ट करून आम्हला पुढच्या प्रवासासाठी निघायचं होता. आज मला जरा comfortable attire हवा होता म्हणून मी पंजाबी सूट घातलेला त्यावर "तू तर ऑफिस ला जातात तशी तयार झालीयेस" अशी कंमेंट एका lady group member कडून मिळाली. म्हटलं चला कोणीतरी notice करतय म्हणजे आपल्याला :D



आज आम्ही Chitkul ला गेलो. तिथे जायचा रस्ता dangerous aahe . गाडी एकदम cut to cut जाते. ती इतकी cut to cut जात होती कि खिडकीतून बाहेर बघायला पण भीती वाटत होती. खूप उंचावर होतो आम्ही. रस्ता खडबडीत होता. ते हॉटेल पासून जवळ होता त्यामुळे सगळ्यांनी bikes तिथेच ठेवलेल्या आणि riders पण आमच्या बरोबर traveler मधेच होते. मधेच काही जण वर टपावर बसले. मी हा stunt already लडाख ला केलेला त्यामुळे इथे करायच्या फंदात नाही पडले आणि तो dangerous रस्ता बघून हिम्मत पण नाही झाली . जान है तो जहान हैं you know. एकदाचे आम्ही पोहोचलो -भारताच्या शेवटच्या गावी Chitkul ला . तिथे मग आम्ही चहा घेतला " हिंदुस्थान का आखरी ढाबा" मध्ये ,तिथेच थोडा वेळ घालवून मग पुढे असलेल्या एका मंदिरात गेलो . तिथे सगळीकडे लाकडी नक्षीदार बांधकाम जास्त आहे. मंदिर साधंसच आहे. लवकर गेल्याने तिथेही गाभारा बंदच मिळाला.





तिथून पुढचा प्रवास खूप लांबचा होता. आम्हाला संद्याकाळी झाली sucide point ला पोहोचायला. मध्येच गण्या ( उर्फ grp leader ) ने permission दिली कि ज्याला कोणाला bike वर जायचं असेल त्यांनी त्या rider विचारा आणि pilion म्हणून थोडा प्रवास करू शकता त्यानंतर चा road चांगला नाहीये so परत traveller मध्ये यावं लागेल . त्यामुळे आम्ही लगेच त्याप्रमाणे कृती करायला घेतली . आता माझा आवडता रंग चिंतामणी निळा असल्याने मी आधी त्या रंगाची bike choose केली आणि नंतर त्याच्या rider ला शोधून मला थोडा वेळ pilion घेऊ शकतो याची permission घेऊन त्याच्याबरोबर ride सुरु केली :) Let me tell you one thing ... Though i love cars but here bike is a freedom . you should take bike ride in Spiti and Ladakh. it really gives you good vibes. Try it haa .. त्या point ला पोहोचताना मधेच एका खडबडीत रस्त्यात शेट्टी ची bike skit झाली. कोणाला दुखापत नाही झाली कारण चढ असल्याने already speed कमी होता. असा कधी तुमच्याबरोबर झालं तर लक्षात ठेवा .. bike सोडा आणि स्वतःला वाचवा. बाकी पुढे कंट्रोल करता येत.


तिथे आम्ही sucide point ला पोहोचलो आणि as usual सगळ्यांचे photo shoot सुरु झाले. Scenery was absolute beautiful आणि photos पण छान येतात तिथून . त्या point ला वरून खाली बघताना निसर्गाच्या प्रचंडतेची अनुभूती येते , सुंदर पण भयानक. खाली पडलो तर न वाचण्याची 100% gurantee. तरीही पाहत रहावस वाटत !!! .. हरवल्यासारखं.



इथे photoshoot करून हसत खिदळत आम्ही kalpa च्या hotel वर पोहोचलो आणि तिथे पुढचं तर तुम्हाला आधीच माहितेय ;)


to be continued ...


Happy Roaming !!!

104 views2 comments

Recent Posts

See All

2 Comments


traveller_spirit_younme Sanket
traveller_spirit_younme Sanket
Aug 21, 2022

The way you written down is absolutely fabulous And refreshing.

Like
onroamingmode
onroamingmode
Aug 21, 2022
Replying to

Thank you so much 😊

Like
bottom of page