top of page

# Spiti Rewind - day on arrival

Writer's picture: onroamingmodeonroamingmode

चंदिगढ ला पोहेचेपर्यंत आरामात flight मध्ये खाणंपिणं झालेलं .... flight meal मला खूप आवडत ... अगदी छोटुकल्या डब्यात बरच काही असत आणि सोबत येणार चहा .. अहाहा .. सुकून you know :) ...


55 mins चा मध्ये layover असल्याने हा हवेतला डब्बा आम्हाला २ वेळा मिळाला .... बस और क्या चाहिये जिंदगी मे .. दुसरी पेटपुजा होईपर्यंत आम्ही पोहोचलो देखील होतो आणि पोटात पण जागा अपुरी पडत असल्याने उरलेलं snacks सोबत घेतलं. कारण आई म्हणते पैसे आणि अन्न वाया नाही घालवायचं म्हणून हा नाहीतर माझा त्यात काही स्वार्थ नाही 😁.


चंदिगढ airport ला पोहोचून थोडा फोटो शूट करून मग हॉटेल पर्यंत पोहोचण्यासाठी गाडीचा शोध सुरु झाला ... बसेस ची frequency खूप होती पण त्या आम्हाला जिथे जायचं होता त्याच्या आस पस पण जात नव्हती. Ola - Uber पण रु . ५०० च्या वरच भाडं दाखवत होत्या. ते तेवढे पैसे कदाचित दिलेही असते पण airport वरून हॉटेल नजरेच्या टप्पयातच होता फक्त तिथे जायचा रास्ता थोडा वळून होता पण त्यासाठी हे एवढे म्हणजे अतीच होत. तिथल्या लोकल टॅक्सी वाल्यांचा पण हेच नाटक होत. बराच वेळ try करून जेव्हा काही नाही झालं तेव्हा मग आमच्या team leader ला पिडुन त्यालाच यायला लावलं , आखिर pick up नही provide करने के लिये कूछ तो बदला बनता ही हैं ना 😉... ( मागाहून त्याने सांगितलं कि ऐन वेळेला pick देणाऱ्या ड्राइवर ने धोका दिला ) .. but thankfully तो आला आणि सोबत होते महविक्रमी संकेत .. महविक्रमी का ते पाहू आपण पुढे ..


तर गण्या ने माझ्या बहिणीला pilion म्हणून घेतला आणि मी संकेत बरोबर होते . अक्षरशः turn मारताना ते इतके bike bend करत होते कि वाटल आता जमिनीला पाया पडत पडतच जावं लागणार आहे 😓.. पण पोहोचलो बाबा एकदाचे व्यवस्थित. त्यानंतर मी त्यांची परत मदत ना घेण्याची प्रतिज्ञा केली .... thanks देवा वाचवल्याबद्दल 😅 ...


to be continued .... .

44 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page