top of page

Kolhapur Road Trip

Writer's picture: onroamingmodeonroamingmode

Updated: Dec 6, 2019

मस्त कधी पण मूड झाला कि गाडी घेऊन फिरण्याच स्वातंत्र्य मुळातच इथे कमी लोकांना मिळत. या बाबतीत मी मात्र लकी आहे कारण मला तस कधीही करता येत. 📷 इतरांना कधी वेळेमुळे तर कधी रस्त्यांच्या आणि ट्रॅफिक च्या विवंचनेमुळे तर कधी उगीचच्या काही बाही फुटकळ कारणामुळे नाही जाता येत. असो तर अचानक एका सुंदर सकाळी मी आणि माझा ट्रॅव्हल पार्टनर Fun-doo ( ती सतत काही ना काही तरी Fun activities करत असते म्हणून तिला मी पाडलेल हे नाव ) आमच्या दोघींचाच जिंदगी ना मिलेगी दोबारा types कोल्हापूर चा plan ठरलेला असतानाच घरातले इतरही त्यात कडमडले. आणि त्या येण्यामागे आम्ही दोघी एकट्याच कश्या जाणार या काळजीपेक्षा आम्ही दोघी बाहेर मजा करणार आणि ते लोक घरातच राहणार याच दुःख त्यांना जास्त होत . त्यामुळे आम्ही दोघी असून एकट्या कश्या हा प्रश्न त्यांना न विचारताच आम्हाला त्यांना पण न्यावं लागलं. 📷 आणि मग सुरु झाली आमची जिंदगी ना मिलेगी दोबारा वरून कभी ख़ुशी कभी गम types फॅमिली picnic to Mahalaxmi Temple Kolhapur 📷 एक जण आमच्याबरोबर bike ने असल्यामुळे लोणावळ्यापर्यंत आतल्या रस्त्यावरून गाडी घ्यावी लागली. कारण एक्सप्रेस highway वर bike चालवायची परवानगी नाहीये. ७ वाजताच टार्गेट ठेऊन ९ वाजता निघणारेआम्ही शूरवीर मग नेहमीच्या पेटपूजा स्थळी म्हणजेच दत्ता स्नॅक्स सेन्टर ला थांबलो. तिथून पोटाला थोडा आधार देऊन मग रुपये २३०/- चा टोल वाचवून आम्ही शेडुंग मार्गे रुपये ३५/- च्या टोल मधेच पुढे लोणावळा एक्सप्रेस ला कनेक्ट झालो 📷. bike पुढे आतल्या रस्त्यावरूनच न्यावी लागली. पण टोल वाचवण्याच्या नादात लोणावळचा जो शार्प वळणावळणाचा घाट होता जो मला खरतर टाळायचा होता तोच घ्यावा लागला 📷. दोनच दिवसांपूर्वी उंदरानी गाडीचे वायर्स कुरतडून मला जो पैशाचा झटका दिलेला त्याहीपेक्षा आता इथे नेमक्या वळणावर जर गाडी बंद पडली तर काय होईल या विचारानेच माझी.... समजून जा काय झाली असेल ते 📷 . कारण गाडीत मिच एकमेव ड्राइवर आणि बाकी सगळी महिला मंडळ, ज्यांच्याकडून गाडी बंद पडली तर " अरे देवा आता काय कराच " या वाक्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मदतीची अपेक्षा नव्हती. त्यामुळे जुन्या खंडाळा घाटाच्या सुरुवातील लागणाऱ्या शिंग्रोबाच्या पाय पडून (अक्षरशः कळवळीची विनंती करून कि गाडी बंद पडू नये) पुढे निघालो. पण हुश्श ..... चढली बाबा गाडी एकदाची अजिबात दगा न देता. त्यामुळे मला माझं यान चंद्रावर पोहोचवल्याचा फील आला ( कारण माझ्यासाठी ते डर के आगे जीत हे types च थ्रिल होत 📷). बाकी घाट चढताना background ला मॉरल सपोर्ट साठी माझ्या लहानग्या भाचीच गाण चालू होत जे written & music composed by herself होत , म्हणजे असा तीच तरी म्हणणं होत. त्यामुळे त्या "डोंगर आला रे .. ए ए " या गाण्याची चाल सुद्धा ती बदलू देत नव्हती आम्हाला. असो मग तिथून पुढे आम्ही कोथरूडला "ढोणेवाडा" म्हणून रस्त्यालगतच्या हॉटेलात दुपारच्या जेवणासाठी थांबलो. ambiance छान होता .जेवणाची quantity पण चांगली होती. पण शाकाहारी पेक्षा मांसाहारी जेवणाची चवच जास्त छान आहे. पुढे मग सातारा ला जाताना एक घाट लागतो आणि मग तो उतरल्यावर अधे मध्ये काही गर्दीमाय टोल लागले, जे परतीच्या वाटेवर असताना रिकामे होते 📷 रस्ते खरंच मस्का होते अजिबात खड्डा लागला नाही. ८०-१२० च्या speed मध्ये आरामात पळवायला हरकत नाहीये. पण मग Google बाबा ने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या वेळात ना पोहोचता रात्री १०. ला पोहोचलो एकदाच.. Ani आणि मग तिथे राहण्यासाठी अजून थोडा struggle करण आलाच कारण ऐन season मुळे सगळे hotels full होते आणि आमचं सगळच हलेडुले असल्यामुळे advance booking च्या भानगडीत आम्ही काही पडलो . त्यामुळे सुमारे दीड तास प्रयत्न केल्यावर एक ३ star hotel मिळालच . आधी वाटत होत कि पैसे जरा जास्तच तर जात नाहीयेत ना पण सर्विस आणि रूम पाहिल्यावर वाटलं कि पैसे वसूल आहेत . थकल्यामुळे सगळे लागेच डाराडूर झाले . दुसऱ्या दिवशी साहजिकच रविवार असल्यामुळे फार जास्तच गर्दी होती दर्शनाला च आम्हाला ३. तास लागले. आणि मग पार्टीच्या वाटेवर लागलो finally. आता वेध लागलेत ते पुढच्या रोड ट्रिप चे 📷📷 Meanwhile, stretch your Limits, Be Yourself & Happy Roaming. काही Tips : १. गाडी चे coolant , oil आणि हवा नीट चेक करून घ्या २. रविवार असल्यामुळे आम्हाला मंदिरात आणि khed Shivapur road ला फार जास्तीच ट्रॅफिक लागलं जे खरंच waste of time होत . त्यामुळे शक्य झाल्यास weekdays मध्ये travel करा जेणेकरून बराचसा time वाचू शकेल. ३. मी दिवसाचं ट्रॅव्हल करण जास्त prefer करते कारण एकतर ते अनोळखी रस्त्यावरून जाताना safe पडत आणि रात्रीच्या ड्राईव्ह मध्ये डोळ्यांवर पडणाऱ्या फ्लॅश light पासून पण सुटका होते.

Parking Lot near Temple
Old Fort Parking Lot


Way to Temple from Parking Lot


113 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


bottom of page