Office colleague : मग .. next कुठे जाणार आता ... बहोत पैसे है रे तेरे पास
घरातले : काय मग आता अजून कुठे भटकायचं बाकी राहिलय ... बराय बाबा तुझं .. घरातली काही काम नको करायला नुसतं भटका
friends : अरे फिर अभीं क्या नया ... और किधर जा रही हें
I mean seriousely.... माणूस एक-दोन, चार- पाचदा कुठे गेला तर त्याला अस सतत काय विचारायचं ... ते ही असा .... म्हणजे एकूण काय तर घरातल्याना वाटत मला ऑफिसवाल्यांनी वाऱ्यावर सोडलंय आणि office colleague आणि friends ना वाटत की मला घरातल्यांनी वाऱ्यावर सोडलंय .. काय बोलणार आता ...
पण जाऊदे आता या सगळ्यांची एवढी ईच्छा आहेच तर म्हटलं का उगीच कोणाला नाराज करा ... चला घ्या गाडी आणि निघा 😉😉
Road trip to Trimbakeshwar.. Nashik ( काही देवभक्ती वगैरे नाही... सुट्टी तेवढीच मिळणार होती म्हणून फक्त तिथे ).
मग काय मी आणि माझा ट्रॅव्हल पार्टनर Fundoo ( माझा छोटासा ट्रिप investor पण 🤗) निघालो भटकायला .. रस्त्यात ताई आणि तिच्या छोट्या पिल्लूला pick केला . मग भाऊजींकडून थोडासा कसा जायचं काय काळजी घ्यायची याबाबतच प्रवचन ऐकून निघालो बाबा आम्ही एकदाचे .... तसा plan सकाळी 7 चा होता निघण्याचा , पण प्रथेप्रमाणे निघालो 9 वाजता 😌. ... आखिर प्रथा भी तो कोई चिज होती है .. . hehehe
रस्त्यात नाशिक रोड ला पाथर्डी फाट्याला Hotel Shiv Sagar ला नाश्ता करून पुढची journey आरामात झाली ... . अगदी वेळेत पोहोचलो आम्ही पहिल्यांदा नाशिक ला म्हणजे जवळपास दुपारी 1.45 @ Gangapur.
एका मैत्रिणीने आधीच सगळं प्लॅन दिलेला म्हणून खुप गोष्टी सोप्या झाल्या .. Thanks yar Monica.
त्याप्रमाणे Gangapur road वर असलेलं साधना .. चुलीवरची मिसळ हा आमचा नाशिक मधला पहिला स्टॉप .. . .. by the way इथे बरच काही होत चुलीवरच , अगदी ice cream सुद्धा.
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म , या श्लोका ला स्मरून आंम्ही तिथल्या पदार्थावर तुटून पडलो उपहारगृहाबरोबर तिथे वेळ जाण्यासाठी पण बराच काही होत. लहान मुलांसाठी paid ride जसा बैलगाडी, उंट , छोटुसा घोडा आणि मोठ्यांसाठी मोठुसा. काही unchargable गोष्टी म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा खेळ, selfie point : ज्यावर selfi घेण्याचा आणि झोपाळ्यावर बसण्याचा मोह तुम्हाला नक्कीच आवरणार नाही. बराच मोठा असल्याने parking ची ही सोय विनामूल्य आहे इथे.
तिथे आम्ही ताव मारलेले पदार्थ म्हणजे चुलीवरची मिसळ, जर तुम्हाला खूप झणझणीत खायला आवडत असेल तर ही तुमच्यासाठी perfect आहे. मिसळबरोबर पाव किंवा भाकरी असे option आहेत. भले मोठे पाव इथेच पहिले मी. ताटाची उत्तम मांडणी. त्यानंतर आली गुळाची जिलेबी , हिची चव normal जिलेबी पेक्षा ही खूप सुंदर , नक्की try करा तस मी गोडखाऊ नाहीये तरीही जिलेबी आवडली हे विशेष. मग नंबर होता मसाला ताक चा, तो ही झक्कास, गर्मी ने आधीच वैतागलो होतो , त्यात ताक ने जरा दिलासा दिला. आणि मग नंबर होता तो आम्हाला कुतूहल वाटणाऱ्या चुलीवरच्या ice cream चा. अरे अरे एकदम काही निष्कर्षाला पोहोचु नका, चुलीवरची म्हणजे काही चुलीवर वितळवून दिली जाणारी गरम गरम ice cream नाही काही.. तर दूध चुलीवर आटवून त्यापासून बनवलेली थंडगार ice cream ... खरंच yummy .. चव जास्त स्पष्ट करून सांगायची म्हटलं तर pure बासुंदी सारखी.
लवकर पोहोचल्यामुळे तिथेच बराच वेळ मजा मस्ती करून झाल्यावर आमच्या त्या दिवसापुरताचा next आणि last stop साठी आम्ही निघालो तो म्हणजे Gangapur backwater ला sunset पाहण्यासाठी. पण मोठाच भ्रमनिरास झाला आमचा कारण ते आता बंद ठेवलय त्यांनी.
त्यामुळे आता हा प्लॅन रोडवल्याने म्हटलं जाऊन येऊ शिर्डी ला आणि येताना त्र्यंबकेश्वर करू.... बहोत time हें अपने पास .... आणि २ तासांचा google बाबा ने जो रस्ता दाखवलेला तिथे आम्ही ३ तासांनी पोहोचलो .... BY GOD उस वक्त तो मेरा भरोसा ही उठ गया था google से ...
शिर्डीला जातानाचा रोड पण highway लागेपर्यंत एकदम निर्मनुष्य होता. मधेच विरळ वस्ती दिसते आणि बाकी दोन्ही बाजूला शेती .. त्यातच भर म्हणून संध्याकाळी ६ ला रात्री ९ वाजल्याचा feel आजूबाजूचा काळोख देतच होता .. Highway लागल्यावर जिवात जिव आला ( i know i know i m soo fattu) .
आम्हाला पोहोचायलाच रात्रीचे साडेआठ झाले त्यात रूम शोधेपर्यंत अर्धा तास गेला आणि मंदिराचे पास ९ वाजताच बंद झाल्यामुळे आम्ही मुख दर्शनच घेतल.. आणि fast n furious pass साठी जे पैसे लागत होते Rs 200/- each ते आम्ही तिथल्याच काही ना काही विकणाऱ्या माणसांना त्यांच्या वस्तूंसाठी bargain न करता आणि त्या वस्तूंची गरज नसताना घेतले, कारण देवाकडे तर खूप आहे ना 😉
सकाळी प्रथेप्रमाणे लवकर निघायचं फक्त बोलून आम्ही उशिराच निघालो. शिर्डी वरून त्र्यंबकेश्वरला आलो. आधीच निघायला उशीर झाल्याने मंदिरात पोहोचायला पण उशिरच झाला . तिथे पण pass ची line वेगात आणि नेहमीची line कासवाच्या गतीने चालली होती... साध्या line मध्ये आमचे २ तास गेले. आम्हाला निघायला उशीर होतोय बघून नाईलाजाने pass च्या line ने जाण्याचा निर्णय घेतला. इथेही Rs 200/- each, लहान मुलांसाठी entry free होती , तस बघायला गेलो तर देवापुढे आम्ही पण लहानच आहोत तरीही आमच्याकडून पैसे घेतले 😓 .
आणि एवढे सगळे उपदयव्याप केल्यानंतर अत्यंत ढकलाढकलीत दर्शन, त्यात ना धड शिवलिंग पाहता येत ना घेतलेली फुल वाहता येतात. आणि माझ्यासारखे लोक ज्याना खरंच जुने शिवमंदिर आणि त्यांच काम आतून बघायला आवडतात त्यांचा सुरक्षा रक्षक पार भ्रमनिरास करतात कारण ते इतक्या जलद गतीने आपल्याला बाहेर काढतात ना की लोकल ट्रेन ची आठवण आल्याशिवाय राहताच नाही, तुम्हाला उतरायचं असो व नसो रस्त्यात असाल तर गर्दी तुम्हाला बाहेर काढतेच. हे टाळायचं असेल तर सुट्टीच्या दिवशी अजिबात जाऊ नका .
Temple P.C. : Smita Patil .... thanks yar
यानंतर parking area मध्ये येताना जे साधारण 1 km लांब आहे मंदिरापासून तिथेच समोर एक लहानशी टेकडी चढलो की श्री अन्नपूर्णा देवीचं संगमरवरी मंदिर आहे. तिथे तर नक्की भेट द्या. मंदिर प्रशस्त आहे आणि आतील बारीक नक्षीकाम पण सुंदर आहे, शांत आणि अगदी प्रसन्न. तिथे अजिबात धक्काबुक्की नाही की पुढे निघ असे ऊदगार नाहीत... मंदिरातून त्रिंबकेश्वरचा रात्रीचा नजारा छान दिसतो. सगळी त्र्यंबक च्या मंदिराच्या अनुभवाने आलेली चिडचिड इथे निघून गेली. इथे यायचा नियम फक्त एकच, आधी दर्शन त्र्यंबक मंदिराचे आणि मग याच. .. असा का ते विचारायचं राहूनच गेलं, तुम्हाला माहीत असेल तर please कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
दुसऱ्या दिवशी office असल्यामुळे तिथे त्या दिवशी थकवा आलेला असला तरी थांबणं शक्य नव्हता , म्हणून डर के आगे वाला decision घेत निघालो .. पण तस नव्हत करायला पाहिजे होत हे पुढे जाऊन कळलं.
मग काय निघालो ... अपेक्षेपेक्षा खूप जास्तच late झाला होता. सगळं time table कोलमडेल होत . संध्याकाळी 7.30 झाले निघायला. निघण्याआधीच थोडं खाल्ल होत त्यामुळे मध्ये एकदा पेट्रोल ला आणि मग direct रात्री १० - १०.३० ला आम्ही जेवायला थांबलो.
योगायोग म्हणजे त्या दिवशी २४ नोव्हेंबर ला त्या रेस्टॉरंट मध्ये माझ्याबरोबरच अजून दोन जणांचे birthday होते त्यामुळे ते लोक cake कापताना hotel वाल्यानी जे birthday song लावलेलं त्यावर आमचं पिल्लू आणि माझ्या co travellers माझं नाव घेऊन गात होत्या .. फनी मोमेन्ट होता तो फार . म्हणजे cake जरी मी कापला नसला तरी feel मात्र नक्कीच घेतला होता .. Kismat you know..
मग परत journey चालू केली . आणि माझं thrill म्हणजे रात्री 12.30 ला कसारा घाट driving.. नेहमीचा भीतीयुक्त प्रश्न मनात . .. साला इथे आता काही झालं आणि गाडी बंद पडली तर ... पण thank god नाही झालं तस काही . पुढे झोप अनावर होत होती म्हणून एका धाब्यावर जिथे बरेच prvivate cars, family persons दिसत होते म्हणून Coffe साठी थांबलो ... मग ताई ने सांगितलं जरा सोडा मार चेहऱयावर झोप जाईल .. पण असला अघोरी प्रकार करूनही काही फायदा झाला नाही . झोप माझा ताबा घेत होती .. मग म्हटलं Coffe घेऊ कारण office मध्ये तर याने झोप जाते तर येईल इथे पण कामाला. पण कसलं काय. आता तुम्ही म्हणाल अरे मग चहा घ्यायची होती ना .. पण चहा ने मला झोप येते ओ . शेवटी झोप घालवण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न निव्वळ अंधश्रद्धा असतात अजून काही नाही हे पटलं. मग 5-10 mins डोळे बंद करून परत पुढे driving ला सुरुवात केली.
माझी हालत बघून बिचारी Fundoo झोपलीच नाही आणि खर सांगायचं तर त्यावेळी कोणीतरी माझ्याबरोबर जाग राहावं ही माझी पण मनापासूनची ईच्छा होतीच . मग काय बरेच overtake ( झोपेत ) करत , मधेच झालेले गाड्यांचे accident बघितल्यावर speed control करत पुढे पुढे जात होतो . कारण आयुष्यात कितीही संकट आली तरी पुढे तर जायचं असत ना . मग मधेच भीती जाण्यासाठी जोरजोरात गायलेली गाणी , म्हणजे तेव्हा जो उरलासुरला जो काही जोर होता तेवढ्याने हा .. पोहोचलो आम्ही एकदाचे मुलुंड चेक नाक्याला . तिथे ताई ला ड्रॉप करून मग सरळ घर गाठलं तेव्हा रात्रीचे २.३० वाजले होते.
पटकन change करून आधीच टाकलेल्या अंथरुणावर टाकून दिल नुसता स्वतःला .. आणि आई शपथ असा राग आला ना मला तेव्हा ... कारण झोप आता पूर्णपणे उडाली होती.
तळटीप : १. Please झोपेत गाडी चालवू नका ..नशीब नेहमीच साथ देत नाही .
२. जर तुम्ही एकटेच driver असाल तर उगाच ठरलेल्या plan मध्ये extra destinations add करण्यापूर्वी स्वतःच्या capacity चा पण विचार करा.
३. नाशिक ला जाताना शक्य असल्यास घोटी मार्गे जाण टाळा. कारण हा रास्ता फारच offroad आहे + सुनसानही आहे .. रात्रीचा अजून dangerous. हा मार्ग टाळण्याने तुमचे ४५ मिनिटे वाढणार but i think precaution is always better than cure. आणि तरीही रात्री जावं लागलंच तर कोणाचीही मदत करण्यासाठी गाडी थांबू नका , हवं तर पुढे जाऊन पोलिसांना काळवा. त्या रस्त्याला नेटवर्क नाहीये . त्यामुळे उगीच सुपरहिरो बनायचं प्रयत्न करू नका.
४. शक्यतो journey लवकर स्टार्ट करा नाहीतर जसजसा उशीर होतो तसतसा कंटाळा येत जातो.
५. नाशिक ला प्रति तिरुपती बालाजी मंदिर आणि नवश्या गणपतीचं मंदिर आहे .. माझं तिरुपती झाल्याने मी ते केलं नाही .पण तरी माझ्या नाशिकच्या मैत्रिणीने दिलेला plan टाकत आहे .. कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकतो , त्यासाठी थँक्स यार मोनिका ..
प्लॅन : हे सगळं line ने करा
# त्रिंबकेश्वर ला ३ तास लागतील .. including line , दर्शन
# संस्कृती गार्डन
# चुलीवरची मिसळ सातपूर रोड
# तिरुपती बालाजी आणि नवश्या गणपती
# कॉलेज रोड वर थोडा फिरू शकतो आणि सालेम चा चहा , पाणीपुरी वगैरे try करू शकतो
So आजच्यपुरता एवढे ज्ञान पुरे आहे. परत भेटूया नवीन किस्स्याबरोबर .. तोपर्यंत हसत राहा , फिरत राहा आणि काळजी घ्या.
HAPPY ROAMING :)
Kommentarer